Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिडीत तरूणीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पारोळा प्रतिनिधी । सामूहिक अत्याचार करून नंतर विष पाजून खून करण्यात आलेल्या तालुक्यातील टोळी येथील तरूणीच्या पार्थिवावर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील टोळी येथील रहिवासी असणार्‍या दलीत तरूणीवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी तिला विष पाजले. त्यामुळे बेशुद्धावस्थेत आधी पोरोळा रुग्णालयात आणि नंतर हिरे शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तिला हलविण्यात आले होते. मंगळवारी पहाटे चार वाजता तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणातील मुुख्य आरोपीने सोमवारी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावरही धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी चार जणांवर पारोळा पोलिस ठाण्यात अपहरण, सामूहिक अत्याचारासह अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे. तर, पोलिसांनी टोळी येथील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रात्री उशीरा टोळी (ता. पारोळा) येथील पिडीत तरूणीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Exit mobile version