Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मजुराचा मारहाणीत मृत्यू : शेतकर्‍यावर गुन्हा

FIR

Parola News पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतमजुराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी शेतकरच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कराडी येथे एका शेत मजुराचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ८ जून २०२२ रोजी त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील रुख्माबाई कमल चव्हाण (वय ३२, ता. पानसमेल, जि. बडवानी) यांनी या संदर्भात पारोळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, कमल चव्हाण हे दोन वर्षांपासून तालुक्यातील कराडी येथे बबलू पाटील यांच्या शेतात सालदारकीचे काम करत होते. यंदा १७ मे रोजी शेतात मिरची लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी रुख्माबाई घरी पाणी पिण्यास आली असता बबलू पाटील यांच्या शेताच्या शेजारी शेतकरी मुकुंदा पाटील यांच्यासह अन्य तीन जण एकमेकांना शिवीगाळ करत होते. या वेळी कमल चव्हाण यांनी ‘माझा परिवार राहत असल्याने शिवीगाळ करू नका’, असे सांगितले. या कारणावरून त्यांनी शिवीगाळ करुन खाटेवर बसलेल्या कमल चव्हाण यांना बेदम मारहाण केली.

यात अत्यवस्थ झालेल्या कमल चव्हाण यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतांना ८ जून रोजी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. मुकुंदा पाटील आणि इतरांनी मारहाणीत मृत्यू झाल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात पारोळा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version