पीएम किसान योजनेत घोळ : आ. चिमणराव पाटलांची चौकशीची मागणी

पारोळा प्रतिनिधी | पंतप्रधान किसान सन्मान योजनेत घोळ असून याची चौकशी करावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

तालुक्यात पीएम किसान सन्मान योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व गैरप्रकाराचा संशय आहे. या प्रकरणी शासकीय व अशासकीय संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना एक पत्र दिले आहे. यात नमूद केले आहे की, स्वतःच्या नावावर एक गुंठा ही शेतजमीन नसलेले पाच सहा हजार जणांना शेतकरी दाखवून तालुक्यात त्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या प्रकरणी किती अचूक बोगस शेतकर्‍यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. ते कोणाच्या लॉगीन वरून करण्यात आले आहे. ज्या लॉगिन वरून हे करण्यात आले आहे. तसेच या बोगस प्रकरणांना मंजुरी देणारे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केली असल्यास काय व कोणावर कारवाई करण्यात आली आहे ? याची माहिती मिळावी असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच या प्रकरणी रक्कम वर्ग झाली आहे. ती परत मिळविण्यासाठी काही कार्यवाही करण्यात आली आहे. का? याची देखील माहिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

आमदार चिमणराव पाटील यांनी अलीकडेच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत जिल्हा रूग्णालयातील घोळाबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. या पाठोपाठ आता त्यांनी पीएम किसान योजनेतील घोळाच्या मुद्यावरून चौकशीची मागणी केली आहे.

Protected Content