दोन गटात हाणामारी : १२ जण जखमी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वाघरे येथे शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून यात १२ जण जखमी झाले आहेत.

वाघरे येथे दोन गटांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली. यात दिनांक १९ रोजी रात्री आठच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. तर यात जखमी झालेल्यांवर दुसर्‍या दिवशी म्हणजे दिनांक २० जून रोजी हल्ला करण्यात आला. यात मल्हारी विक्रम पाटील, सुदाम रमेश पाटील, रोशन पुंडलिक पाटील, सुनील रमेश पाटील, नाना भिकारी पाटील, भाऊसाहेब भिकारी पाटील, रमेश विक्रम पाटील, अनिल मल्हारी पाटील, पुंडलिक विक्रम पाटील, महादेव नानू पाटील, योगेश कृष्णा पाटील, दीपक महादू पाटील, आधार भिकारी पाटील, महादू पाटील, गजेंद्र नाना पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी धुळ्यातील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड, प्रवीण पाटील, महेश पाटील, बापू पारधी, किशोर भोई, यांनी रूग्णालयात धाव घेतली. या बाबत कृष्णा भिकारी पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी मनोज मल्हारी पाटील ,अनिल मल्हारी पाटील, सुदाम रमेश पाटील, सुनील पाटील, पुंडलिक विक्रम पाटील, रमेश विक्रम पाटील, मल्हारी विक्रम पाटील व रावसाहेब मगन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content