Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; मेहुणा व शालक जागीच ठार

पारोळा प्रतिनिधी | तालुक्यातील मोरफळ ते मंगरूळ गावांच्या दरम्यान दुचाकीला मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत शालक व मेहुण्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

बहादरपूर (ता.पारोळा) येथील मेहुणा लक्ष्मण बबन भील (वय २७) आणि शालक दीपक मंगा भील (वय ३०) हे दोघे उसतोड मुकादमाकडे मजुरीचे पैसे घेण्यासाठी कासोदा येथे दुचाकीने जात होते. वाटेत मोरफळ ते मंगरुळदरम्यान त्यांच्या दुचाकीला (क्र.एम.एच.१९-आर-०७२६) समोरून येणार्‍या टाटा मॅजिक वाहनाने (क्र.एम.एच.२०-बी.वाय.३०८५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांना जबर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर टाटा मॅजिक वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत लक्ष्मण बबन भील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, तर मृत दीपक मंगा भील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे बहादरपूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version