Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रातील’ या’ पाच खासदारांना संसदरत्न पुरस्कार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संसदेत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि लोकांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदाच्या या पुरस्कारांच्या मानकरींची यादी जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन खासदार, शिवसेना शिंदे गटातील दोन खासदारांचा समावेश आहे. तर भाजपच्या एका महिला खासदाराचा या पुस्कारार्थींच्या यादीत समावेश आहे. आज या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. राजधानी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत दिल्या जाणाऱ्या संसद रत्न पुरस्कारांचं आज वितरण होणार आहे. राजधानी दिल्लीत हा कार्यक्रम होतो आहे. महाराष्ट्रातील पाच खासदारांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. तर पश्चिम बंगालच्या काँग्रेस खासदाराचाही यात समावेश आहे. या खासदारांना आज पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भाजपच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार हिना गावित आणि काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना संसद महारत्न पुरस्कार यांना जाहीर झाला आहे.

संसदरत्न पुरस्कार शिंदे गटाचे कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर झाला आहे. भाजपचे नेते सुकांत मजूमदार आणि सुधीर गुप्ता यांनाही पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. तर काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा यांचाही आज सन्मान केला जाणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आग्रहाखातर प्राइम प्वाइंट फाउंडेशनने हा पुरस्कार सुरू केला. 2010 ला या पुरस्काराचं अब्दुल कलाम यांनी उद्घाटन केलं. दर वर्षी संसदेत आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो. यंदा सात जानेवारीला या पुरस्कारांची घोषणा झाली. त्यानंतर आज हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.

Exit mobile version