Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोवंश घेऊन जाणारे वाहन पेटवले;दोन पोलिस कर्मचारी जखमी

एरंडोल (प्रतिनिधी)तालुक्यातील पिंपळगाव प्र.चा. येथे मंगळवारी रात्री पकडलेले गोवंशचे वाहन एरंडोल पोलीस स्थानकात घेऊन जातांना रिंगणगाव-चोरटकी गावाजवळ अज्ञात लोकांनी पेटवून दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यावेळी अज्ञात समाजकंटकांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली. त्यात दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील पिंपळकोठा प्र.चा येथे मंगळवारी रात्री साधारण ९.३० वाजेच्या दरम्यान,एक गोवंश घेऊन जाणारी एक मालवाहू रिक्षा पकडली. गावातील लोकांनी हे वाहन पकडून त्याची हवा सोडली.वाहन चालक मात्र,गाडी सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पो.कॉ.संदीप सातपुते व उमेश पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांची समजूत काढत वाहन नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी एरंडोल पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. परंतु काही टवाळखोर पोरांनी दुसरे चाक देखील पंचर केलेले असल्यामुळे हे वाहन रिंगणगाव व चोरटकी गावाच्यामध्ये जंगलात बंद पडले. हि बाब आजुबाजूच्या गावात गेली.त्यानंतर अंधाराचा फायदा घेत दीडशे ते दोनशे टवाळखोरांनी वाहन पेटवून दिले. या गोष्टीला विरोध केला म्हणून पोलिसांवर देखील दगडफेक केली. त्यात पो.कॉ.संदीप सातपुते व उमेश पाटील हे दोन कर्मचारी जखमी झाले. यामुळे रात्री परिसरात प्रचंड खळबळ उडालेली होती. या संदर्भात पोलीस कर्मचारी उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री पोलिसांनी धरपकड करत सात ते आठ जणांना अटक केली आहे.

Exit mobile version