Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात रंगली परिवर्तनची दिवाळी पहाट !

diwali pahat jalgaon

जळगाव प्रतिनिधी । परिवर्तन जळगाव तर्फे दिवाळी निमित्त नरकचतुर्दशीच्या मुहुर्तावर दिवाळी पहाट या सांगितीक मैफलीचे आयोजन करण्यात आले.

पारंपरिक सणाला हजारो वर्षांपासून परंपरा आहे. ही परंपरा तालासुरांनी सजवत, दिवाळीचं महत्त्व मांडत अवीट, मधूर गीतांनी नरकचतुर्दशीची पहाट परिवर्तनच्या कलावंतांनी रंगवली. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व, त्याची आख्यायिका विविध कथेच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. कलावंतांनी
आरंभी वंदिन, ज्योती कलश, ओवाळीते मी, जागो मोहन प्यारे, म्हारे जन्म-मरण बन हो हे मिराबाईचे भजन , दिवाळी येणार अंगण सजणार, दिवे लागले रे, आली माझ्या घरी दिवाळी, धरत्रीच्या कुशीमधी, मुंजा, हेचि दान देगा देवा अशी अनेक सुमधुर गितांना सादर केले. मराठी, छत्तीसगढ़ी, राजस्थानी भजन, अभंग, भावगीतं, वही लोकगीत अशा वैविध्यपूर्ण गीतांनी मैफल रंगली. रजनी पवार, हर्षदा कोल्हटकर, मंजुषा भिडे , भूषण गुरव, भूषण खैरनार, प्रतीक्षा कल्पराज यांनी गाणी गायली. बासरीवर साथ योगेश पाटील, ढोलकीवर मनिष गुरव, हार्मोनियमवर भूषण खैरनार तर तबल्यावर भूषण गुरव यांनी साथसंगत दिली.

कार्यक्रमाची निर्मिती श्रद्धा पुराणिक, कुलकर्णी व अक्षय गजभिये यांची होती. तर संकल्पना शंभू पाटील यांची होती. दिग्दर्शन सुदिप्ता सरकार यांनी केले. यात मंजुषा भिडे व हर्षल पाटील निवेदन केलं. कार्यक्रमाला पाउस असून देखील लक्षणीय उपस्थिति होती. डॉ. शशिकांत गाजरे, नंदलाल गादिया, उदय कुलकर्णी, माजी नगरसेविका अश्‍विनी देशमुख, आनंदयात्रीचे अमोल सेठ, नगरसेवक अनंत जोशी, डॉ अमोल सेठ, सुरेंद्र पाटील, रंगकर्मी पियुष रावळ आदी मान्यवरांसह रसिक प्रेक्षक याप्रसंगी उपस्थित होते.

Exit mobile version