Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय बंजारा परिषेदच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी पप्पू तवर तर उपाध्यक्षपदी शत्रुघ्न चव्हाण

जामनेर प्रतिनिधी । राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्षपदी पप्पू तवर यांची तर उपाध्यक्षपदी शत्रुघ्न चव्हाण यांची निवड करण्यात आली.

तालुक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर असून बंजारा समाजाचे अडीअडचणी सोडवण्यासाठी समाज बांधवांनी एकत्रित येऊन समाजाच्या हिताचे काम करावे असे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषद बैठकीत घेण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या विविध नियुक्त्या करण्यात आल्या.

यात  जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी देवा पवार, जामनेर तालुका अध्यक्षपदी पप्पू हेमराज तवर तर उपाध्यक्षपदी शत्रुघन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपसभापती दीपक चव्हाण यांनी बोलताना सांगितले की, आजही बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर वाड्या वस्तीवर राहत असून शिक्षणापासून वंचित असल्याकारणामुळे मोठ्या प्रमाणावर बंजारा समाजाचा विकास झालेला नाही. त्यामुळे बंजारा समाजाने संघटीत होऊन बंजारा समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण सर्व बंजारा समाज बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन यावेळी बोलतांना केले.

 

यावेळी बैठकीमध्ये नवनिर्वाचित नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. या बैठकीला राष्ट्रीय बंजारा परिषद जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद पवार, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड, वाळुंज महानगराध्यक्ष कांतीलाल राठोड, गोर समाज सेवक करतार राठोड, जळगाव जिल्हा संघटक प्रमुख व बैठकीचे आयोजन नितीन नाईक, जिल्हा मीडिया प्रमुख अनिल तवर, डोहरीतांडा नायक ताराचंद तवर, जोतमल तवर, हेमराज तवर, महाराज तवर, भारमल तवर, भारमल तवर, निलेश चव्हाण, विकास तवर, विलास चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version