Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्राळा येथे पानटपरी फोडली; एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील पान सेंटर एकाने फोडून रोख रक्कम आणि सामान असा एकुण २७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, काशीनाथ रामजी ठाकूर (वय-८४) रा. तलाठी ऑफीस जवळ पिंप्राळा याचे पिंप्राळा भागातील भवानी माता मंदीराजवळ पान टपरी आहे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते १४ ऑगस्ट रोजी ७.३० दरम्यान पानटपरी बंद असतांना इस्माईल शेख सैय्यद (वय-१९) रा. पिंप्राळा हुडको याने टपरी फोडून १ हजार रूपये रोख आणि २६ हजार रूपये किंमतीचा टपरीतील सामान यांची चोरी केल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात इस्माईल सय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला रामानंदनगर पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास संजय सपकाळे करीत आहे. 

 

Exit mobile version