Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून भाजपचा उल्लेख काढला

pankaja

मुंबई (वृत्तसंस्था) एकीकडे फेसबुक राजकीय भूकंपाचे संकेत देणारी पोस्ट तर दुसरीकडे ट्विटर हॅण्डलवरुन भाजपचा उल्लेख गायब झाल्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

 

पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे. पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे, असे पंकजा मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजपचा उल्लेख आज गायब झाल्याचे समोर आले आहे. पंकजांनी आपल्या ट्विटर हॅण्डलमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. यापूर्वी पंकजांच्या ट्विटर प्रोफाईलध्ये मंत्रिपदाचा उल्लेख होता.

Exit mobile version