Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? ; पंकजा मुंडेंकडून भाजपला सोडचिठ्ठीचे संकेत

pankaja

 

बीड (वृत्तसंस्था) पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे, अशा शब्दात माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपला सोडचिठ्ठीसह राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.

 

 

आपली फेसबुक पोस्टमध्ये मुंडे यांनी म्हटलेय की, आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे… आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार असल्याचे म्हटले आहे. मुंडे यांच्या पोस्टमधील मजकूर लक्षात घेता, त्या भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातेय.

Exit mobile version