Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा तालुकास्तरीय  क्रिकेट स्पर्धेत पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला विजेतेपद    

WhatsApp Image 2019 09 13 at 10.33.13 AM

चोपडा, प्रतिनिधी | राज्य क्रीडा व युवकसेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव आणि चोपडा तालुका बहुविध क्रीडा परीषद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शासकीय शालेय तालुकास्तरीय १७ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलने तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले.  त्यांनी  जळगाव जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चोपडा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान प्राप्त केला.

या स्पर्धा पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या मैदानावर घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेत एकूण ५ संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामना पंकज विद्यालय चोपडा व पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल यांच्यात रंगला होता. त्यात पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला विजेतेपद व पंकज विद्यालयास उपविजेते पद मिळाले.  स्कूलचे संस्थापक चेअरमन डॉ. सुरेश पंडीत बोरोले व संस्थेचे संचालक पंकज बोरोले तसेच तालुका क्रीडा संयोजक  राजेंद्र अल्हाट व स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले. संघाचे क्रिकेट कोच रूपेश शेलके व वस्तिगृह प्रमुख के.पी.पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. परिसरात सर्वदूर खेळाडूंचे कौतुक होत आहे.

Exit mobile version