Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर पानीपतमधील ‘त्या’ दृश्यांना कात्री !

panipat

मुंबई प्रतिनिधी । दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत या ऐतिहासिक चित्रपटातील काही दृश्यांवर जाट समुदायाने आक्षेप घेतला होता त्यांना आता कात्री लाऊन कापून टाकण्यात आले आहे.

पानीपत चित्रपटातील काही दृश्यांना राजस्थानमधील जाट समुदायाने विरोध दर्शवला आहे. चित्रपटात महाराजा सूरजमल यांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. पानीपतमध्ये भरतपूरचा जाट महाराजा सूरजमल लोभी व स्वार्थी असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावर जाट समुदायाने आक्षेप घेत. चित्रपट बंद करण्याचे आवाहन केले होते. कुठलेही संशोधन न करता चुकीच्या व्यक्तिरेखा रंगवल्याचा आरोप जाट समुदायाने केला होता. त्यानंतर चित्रपटाच्या ज्या दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. चित्रपटातील तो ११ मिनिटांचा वादग्रस्त भाग वगळण्यात आल्यानंतर सेंन्सर बॉर्डकडे पाठवण्यात आला. त्यानंतर चित्रपटाला सर्टीफिकेट मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. पण आता चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्यच काढून टाकण्यात आल्याने या चित्रपटाला होणारा विरोध मावळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version