Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंडित जसराज कालवश; स्वर्गीय सूर काळाच्या पडद्याआड

मुंबई प्रतिनिधी । संगीत मार्तंड म्हणून ख्यात असणारे महान शास्त्रीय गायक पंडित जसराज यांनी आज शेवटचा श्‍वास घेतला आहे.

पंडीत जसराज (वय ९० ) यांचे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे निधन झाले आहे. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत मार्तंड म्हटले जाते. ते मेवाती घराण्याचे गायक होते. पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्यांनी वडील पंडीत मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी थोरले बंधू मेवाती घराण्याचे महाराज जयवंतसिंह वाघेला आणि उस्ताद गुलाम कादरखाँ यांच्याकडून जसराज यांनी गायनाचे उच्च शिक्षण घेतले. आग्रा घराण्याचे स्वामी वल्लभदास यांच्याकडूनही त्यांनी धडे गिरवले.शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख होती.

भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशीच भावना व्यक्त होत आहे.

जसराज यांनी पंडित प्रसाद दुसाने, पंडित संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी, पंडित रतन मोहन शर्मा, अंकिता जोशी आणि श्‍वेता जव्हेरी यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले. पंडित जसराज यांच्या पश्‍चात्य त्यांची पत्नी मधु जसराज आणि कन्या दुर्गा जसराज आहेत

Exit mobile version