Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंढरी हादरली ! चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून सहा जण मृत्युमुखी

पंढरपूर । चंद्रभागा तीरावर नव्याने बांधण्यात आलेली कुंभार घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पंढरीत सकाळपासूनच पाऊस सुरु आहे. अशातच आज  दुपारी अडीचच्या दरम्यान भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. पाऊस सुरु असल्याने भिंतीच्या आडोश्याला अनेक जण उभे होते. यातील सहा जण भिंतीच्या मलब्याखाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पाऊस सुरु असल्याने मंदिर परिसरातील भिकारी भिंतीच्या आडोश्याला उभे होते. दुपारी अडीचच्या सुमारास अचानक भिंत कोसळली. या दुर्घटनेनंतर भिंतीच्या मलब्याखाली दबलेल्यांनी मोठा आक्रोश केला. दुर्घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, पावसामुळे अनेक जण भिंतीच्या आडोशाला अनेक जण उभे होते. अशातच भिंत कोसळल्याने मलब्याखाली अनेक जण दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Exit mobile version