Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महत्वाच्या सभेला मुद्दाम डावलले- पल्लवी सावकारेंचा आरोप

भुसावळ प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या महत्वाच्या सभेला आपल्याला उशीरा लिंक पाठवून मुद्दाम डावलल्याचा आरोप जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला आहे.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन या महत्त्वाच्या समितीची ऑनलाइन सभा १४ रोजी सकाळी ११ वाजता झाली. सभेसाठी सदस्यांना एक दिवस आधीच लिंक शेअर करणे आवश्यक असताना जिल्हा परिषदेने मात्र या समितीच्या सदस्या पल्लवी सावकारे यांना सभा संपल्यानंतर ही लिंक पाठवल्याचा आरोप केला आहे.

पल्लवी सावकारे (pallavi savkare, bhusawal )या अभ्यासपूर्ण पध्दतीत आक्रमक भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेकदा अधिकारी व पदाधिकार्‍यांना धारेवर धरले आहे. यामुळे या सभेसाठी आपल्याला जाणीवपूर्वक डावल्याचा आरोप त्यांनी केला. जलव्यवस्थापन समितीची सभा अवघ्या १५ मिनिटात आटोपण्यात आली. लिंक ओपन करण्यापूर्वीच सभा संपल्याचे जाहीर केल्याने यात काही तरी गौडबंगाल असल्याचा त्यांचा आरोप आहे.

यासोबत वाळू पावत्या आणि रॉयल्टीसंदर्भात जिल्हा परिषद सदस्या म्हणून मी माहिती मागवली आहे. संबंधित विभागाकडून ही माहिती दिली जात नाही. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी पत्र देऊन देखील जलसंधारण विभाग ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे हीच माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला अवघ्या तासाभरात देण्यात आल्याने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version