Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधी येथे गुलाबराव देवकर यांचा प्रचार व संवाद रॅली

Gulabarao patil paldhi

पाळधी प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदार संघाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबरा देवकर यांचे पाळधी खुर्द।। व पाळधी बुद्रुक।। या दोन्ह गावातील नागरीकांशी संवाद साधून प्रचार रॅली काढण्यात आली. आगामी काळात रखडलेले सिंचन कामे मार्गी लावण्यासाठी परीवर्तनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रचारादरम्यान मतदारांना केले. प्रचार रॅलीपुर्वी सावता महाराज मढी, हनुमान मंदीरात नारळ वाढवत तर हजरत शाहनुर शहाबाबा दर्ग्यावर चादर चढविली. यानंतर ढोल ताश्यांच्या गजरात निघालेल्या प्रचार व संवाद रॅली दरम्यान अनेक ठिकाणी स्वागत तर महिला भगिनींकडून औक्षण करत शुभेच्छा दिल्यात.

प्रचारात यांनी घेतला सहभाग
या प्रचार रॅलीत पक्षाचे कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, माजी जि.प.सदस्य रविंद्र पाटील, तालुकाध्यक्ष धनराज माळी, तालुका युवकाध्यक्ष नाटेश्वर पवार, मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, पिपल रिपब्लिकनचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश मोरे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, किरण नन्नवरे, डॉ.व्ही.आर. पाटील, डॉ.व्ही.व्ही. पाटील, प्रा.एन.डी. पाटील, धरणगावचे ओंकार माळी, नारायण महाजन, नारायण चौधरी, भोदचे संभाजी पाटील, चावलखेड्याचे राजू वाणी, शेरी शामकांत पाटील, पथराडचे मधुकर पाटील, रामकृष्ण पाटील, मनोज पाटील, आव्हाणीचे जानकीराम पाटील, महिला पदाधिकारी वैशाली बऱ्हाटे, सीमा नेहेते, कल्पना भालेराव, मथुरा पवार, ज्योती सोनवणे, माया नन्नवरे, बेबाबाई नन्नवरे, अब्दुल पटेल, भगवान सोनवणे, सुरेश नन्नवरे, बापु भालेराव, जावेद शेख, हबीद मणियार, शरीफ शेख, श्रीराम पाटील, किरण पाटील, इकबाल देशमुख, किरण तायडे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version