Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधी येथील वयोवृद्ध महिलेचा आकस्मात मृत्यू

जळगाव प्रतिनिधी | मुलाच्या कामाचे पैसे घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या 60 वर्षीय वृद्ध महिलेचा आकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत माहिती अशी की, वैजंताबाई शांताराम महाजन (वय 62) रा. पाळधी ता. जळगाव या आपला मोठा मुलगा सुधाकर महाजन त्याच्या कामाचे पैसे घेण्यासाठी बांभोरी येथील जैन कंपनीत गेल्या. दुपारी ३ वाजता त्यांना अचानक चक्कर येऊन खाली पडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.कुरकुरे यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.

Exit mobile version