Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉटेल मालकावर जमावाचा हल्ला; हप्ता न दिल्यास ठार मारण्याची धमकी ( व्हिडीओ)

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । महिन्याला दहा हजार रूपयाचा हप्ता द्यावा लागेल अन्यथा हॉटेल बंद पाडून अशी धमकी देत पाळधी येथील हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली असून हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

किरण त्र्यंबक नन्नवरे (रा. सिध्दार्थनगर, पाळधी खुर्द) असे जखमी हॉटेल चालकाचे नाव असून खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पाळधी खुर्द येथे किरण नन्नवरे हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचे पाळधी येथे साईनाथ नावाने हॉटेल आहे. १० ते १५ दिवसांपूर्वी राहुल सपकाळे नामक तरूणाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. गुरूवारी सायंकाळी ७ वाजता राहुल हा दोन ते तीन जणांसोबत पुन्हा हॉटेलवर आला. मी मागे पैसे मागितले तु दिले नाही, म्हणून वाद घालू लागला. त्यानंतर त्याने जेवण मागितले. किरण यांनी लागलीच वेटरला सांगून जेवण देण्यासाठी सांगितले.

राहुल सपकाळे व त्याच्यासोबत आलेल्यांचे जेवण आटोपल्यानंतर किरण नन्नवरे यांनी त्यांना जेवणाचे बिल मागितले. त्यावर राहुल याने कसले पैसे मागतो आहे, असे म्हणत वाद घातला़ त्यानंतर किरण यांना बेदम मारहाण केली. खूर्चीनेही त्यांना मारहाण करून तोडफोड केली़ डोक्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आला. त्यात ते जखमी झाले. लागलीच त्यांनी पोलिसांना संपर्क साधला. काही वेळानंतर पोलिसांनी घटनास्थळी गाठले. नंतर किरण यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आपल्या जीवाला या लोकांपासून धोका असून आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी किरण नन्नवरे यांनी केली आहे.

Exit mobile version