Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधी येथे रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने अनोळखी पौढाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास पाळधी येथील अप लाईनवर झाली. याप्रकरणी पाळधी रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या खबरीवरून पाळधी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, पाळधी खुर्द शिवारातील जळगाव सुरत अप लाईनच्या खंबा क्रमांक 253 जवळ एका 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत पाळधी स्टेशन प्रबंधक यांच्या खबरीवरून पाळधी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याप्रकरणी प्राथमिक तपास पोहकॉ अरून निकुंभ करीत आहे.

Exit mobile version