Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चित्रकार सुनिल दाभाडेंनी दगडावर रेखाटली देवीची विविध रूपे

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक, चित्रकार सुनिल न्हानू दाभाडे यांनी नवरात्र उत्सवानिमित्त चक्क दगडावर देवीचे मनमोहक व आकर्षक असे चित्र रेखाटून नवरात्र उत्सव साजरा केला.

 

महाकाली माता, सप्तशृंगी देवी, महालक्ष्मी देवी, रेणुका देवी, आदी देवीचे दगडावर देवीचे सुंदर चित्र रेखाटले आहे. चित्रकार सुनिल दाभाडे यांनी याआधी ही वेगवेगळे प्रयोग केले. जसे ज्वारीचा भाकरीवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर चित्र रेखाटले होते. त्या पेंटीगची नोंद ओ.एम.जी नॅशनल बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच पेंटीगमध्ये गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. तव्यावर कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे चित्र रेखाटले आहे. नवरात्रात चक्क सुपारी नऊ दिवसाचे नऊ देवीचे चित्र काढले होते.

कोरोना काळात सुनिल दाभाडे सरांनी चौकाचौकात जाऊन रस्त्यावर कोरोना विषयी चित्र काढुन जनजागृती केले. असे नवनवीन उपक्रम राबवून चित्रकार सुनिल दाभाडे यांनी आपले व शाळेचे नाव जगाचा पाठीवर नेले आहे.  यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलीया,मानद सचिव विश्वनाथ जोशी , सर्व पदाधिकारी, सदस्य प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सुनिल दाभाडे सरांचे अभिनंदन केले.

 

Exit mobile version