Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजेच्या धक्क्याने पेंटरचा जागीच मृत्यू; पांडे चौकातील घटना, एमआयडीसी पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पांडे चौकात रंगकाम करतांना ४० वर्षीय तरूणाला इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

बाबुलाल बनीमियॉ पटेल (वय-४०) रा. तांबापूरा जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, बाबुला पटेल हे पेंटरचे काम करतात. घरात आईवडील तीन भाऊ, पत्नीसह राहतात. पेंटर काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सहकारी सिकंदर तडवी यांच्यासोबत पांडे चौकातील सुरेंद्र नथमल लुंकड यांच्या पत्र्याच्या शेडला रंगकाम करण्याचे काम करत होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास रंगकाम करून पत्र्याच्या शेडवरून सीडीने खाली उतरत असतांना त्यांचा हाताला इलेक्ट्रीक वायरला धक्का लागल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान मयत झालेल्या तरूणाची घरीची आर्थीक परिस्थिती हालाखीची असल्याने कुटुंबियाला आर्थीक मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. यावेळी नातेवाईक व मित्रपरिवारांची जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी जमली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मयताच्या पश्चात आई अबीदाबी, पत्नी फरीदा, फरान, सना, शहिन हे तीने मुले आणि लतीफ, हारून आधि शरीफ हे तीन भाऊ असा परिवार आहे. मयत बाबुलालच्या नातेवाईकांना काम करून घेणाऱ्या व्यक्तीकडून आर्थीक मदत मिळावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा हिंदू-मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर वेलफेअर असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष इस्माईल खान, जिल्हा सल्लागार अकील शेख अहमद, दगडू शहा पेंटर आदींनी केली आहे. 

Exit mobile version