Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेखाली पहूरच्या तरूणाची आत्महत्या

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । शहरातील पहूरपेठ येथील तरूणाने पाचोरा रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. 

सविस्तर माहिती अशी की, पहूर पेठ येथील संतोषी माता नगरातील रहिवासी कडुबा हरी भडांगे (वय ४५ ) हे आज सकाळी कामानिमित्त  घरून निघाले. मात्र दुपारी १ वाजेच्या सुमारास  पाचोरा येथील रेल्वे स्थानकापासून जवळच रेल्वे रुळावर त्यांनी समोरून येणाऱ्या रेल्वे खाली उडी घेत जीवन यात्रा संपवली. या दुर्घटनेत त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे रुळावर विखुरला गेला. मात्र अपघात स्थळी त्यांचा मोबाईल बाजूलाच पडला असल्याने मोबाईलच्या मध्यमातून त्यांची ओळख पटली. स्थानिक कर्मचार्‍यांनी मोबाईलवर संपर्क करून पहूर येथील नातेवाईकांनाघटनेची माहिती दिली. सदरी व्यक्ती पहूर येथील असल्याने निष्पन्न झाले.  मृतदेह पहूर येथे आल्यावर त्यांच्या पत्नीसह नातेवाइकांनी एकच टाहो फोडला .आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे. सायंकाळी पहूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .

Exit mobile version