Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे भरदिवसा घरफोडी; दिड लाखांचा ऐवज लंपास

pahur gharfodi news

पहूर, ता.जामनेर । येथील पहूर पोलीस स्टेशनचे पाठीमागे असलेल्या महेशनगर येथील बसचालक वासुदेव तुकाराम बुंदे यांच्या बंद घर भरदिवसा सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी दरोडा टाकून सोन्या, चांदीचे दागिनेसह व रोकड असे दिड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, पहूर पोलीस स्टेशनचे पाठीमागे महेश नगर येथील एस. टी. ड्रायव्हर वासुदेव तुकाराम बुंदे हे आपल्या डिवटीवर गेले असतांना तसेच सकाळी 11 वाजेदरम्यान मुलगी ममता बुंदे व कांताबाई बुंदे हे घराचे दरवाजाचा व लोखंडी गेटला कुलूप लावून बाजारात दुकानावर कपडे घेण्यासाठी गेले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कपडे घेऊन घरी आले असता, त्यावेळी लोखंडी गेटचे कुलूप उघडून आत दरवाजा जवळ गेले. घराचे दरवाजाचे कुलूप दिसले नाही. व दरवाजा बंद होता मुलगी व आई यांनी दरवाजा उघडून प्रवेश केला असता घरात पलंगावर कुलूप तोडलेले दिसले. घरातील कपाटात ठेवलेले पैसे व सोन्याचे दागिने व चांदीचे दागिनेसह दिड लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून लंपास केला. याबाबत वासुदेव तुकाराम बुंदे यांनी पहूर पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पहूर पोलीस करीत आहे.

दरम्यान चार सप्टेंबर 2019 रोजी संतोषीमातानगर येथे तीन ठिकाणी चोरी झाली होती. तर परत दोन महिन्यानंतर चार नोव्हेंबर 2019 रोजी परत संतोषीमातानगरात एकाच रात्री चार ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून एक लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. यात पत्रकार शरद बेलपत्रे, शिक्षक विकास पाटील व बांधकाम व्यावसायिक सुनील कुमावत यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लाखाचा ऐवज लंपास केला होता. तर एका पोलीस अधिकाऱ्याकडे चोरीचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला होता. या घरफोड्यांचा तपास तर लागलाच नाही. तर पुन्हा चार डिसेंबर 2019 रोजी पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलीस स्टेशन च्या पाठीमागे महेश नगर येथे भर दिवसा घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दिड लाखांचा ऐवज लंपास केल्याने पुन्हा खळबळ उडाली असून या चोऱ्यांचा तपास लावण्याचे फार मोठे आव्हान पहूर पोलीसांना आहे.

Exit mobile version