Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोवंशाची अवैध वाहतूक करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा

FIR

पहूर , ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राजस्थानातून विनापरवाना औरंगाबादकडे ट्रक द्वारे नेल्या जाणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या कारवाई १३ गाईंची पहूर पोलिसांनी सुटका केली आहे.

एका ट्रकमधून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती पहूर पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे वाकोद रस्त्यावर एस एस पी पेट्रोल पंप जवळ पहूर -औरंगाबाद महामार्गावर ट्रक क्रमांक आर .जे . ६ जी .सी . ३३९९ या वाहनाला ताब्यात घेण्यात आले. याची तपासणी केली असता यामधून ११ गायी व २ वासरे अशी १३ गोवंशाची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

या अनुषंगाने जमील मोहम्मद इब्राहिम मोहम्मद आणि बबलू मोहम्मद गणी (रा . कनिया , ता . गांगेडा ,जि. भीलवाडा ,राजस्थान) यांच्या विरुद्ध पो . कॉ . जीवन बंजारा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला . पोलीसांनी ट्रक ताब्यात घेऊन गायींची सुटका करून त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात केली.

Exit mobile version