Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस स्थानकाच्या जवळच साडे सतरा लाखांचा दरोडा

पहूर, ता जामनेर प्रतिनिधी | येथील पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या व्यापार्‍याच्या घरावर दरोडा टाकून साडे सतरा लाख रूपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत वृत्त असे की, राजस्थान येथे फिरायला गेलेल्या पहूर येथील भुसार माल व्यावसायिकाच्या घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी साडेसातरा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पहूर पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर राहणारे अनिल रिखबचंद कोटेचा हे कुटूंबियांसोबत २५ ऑगस्ट पासून पर्यटनासाठी गेले होते.त्यामुळे घर बंदच होते. या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सत्तेचाळीस तोळे सोने , ५०० ग्राम चांदी ,तसेच २लाख ९० हजार रुपयांची रोकड असा एकूण साडे १७ लाखांचा ऐवज लुटून लंपास केला .चोरट्यांनी प्रथम घरा बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दरवाजाचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला. यानंतर घराची झाडाझडती घेऊन कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत कपाटात ठेवलेली रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले . या घटनेची माहिती पर्यटनासाठी गेलेल्या अनिल कोटेचा यांना समोर गोडाउन मध्ये काम करणार्‍या हमालांनी दिली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.

याबाबत त्यांनी पहूर पोलिस स्टेशनला माहिती दिली .घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळी जळगाव येथील श्वान पथकासह, ठसे तज्ञांनी भेट दिली . याप्रकरणी पहूर पोलिस स्टेशनला अनिल कोटेचा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Exit mobile version