Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर पेठ उपसरपंचपदी शरद पांढरे यांची निवड

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पहूरपेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद भागवत पांढरे यांची निवड झाली.

जामनेर तालुक्यातील सर्वात मोठी व महत्त्वपूर्ण असलेल्या पेठ ग्रुप ग्रामपंचायतीची ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा ११  जागांवर विजय झाला होता तर सरपंचपदी अब्बु तडवी यांच्यासह भाजपचे ७ उमेदवार निवडून आले होते.

दरम्यान आज गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी  पहूरपेठ, सांगवी,  खर्चाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सभागृहात दुपारी उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली .राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शरद पांढरे व राजू जेंटलमन यांनी  तर भाजपतर्फे महेश पाटील व हिना कौसर अशा चौघांनी अर्ज दाखल केले.

राजू जेन्टलमन व महेश पाटील  यांनी माघार घेतल्याने अखेरीस शरद पांढरे व हिना कौसर बी शेख यांच्यात मतदान झाले.  शरद पांढरे यांना ११ तर हिना कौसर यांना ७ मते मिळाली .पिठासीन अधिकारी ऋषिकेश जाधव,  निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी डी . पी . टेमकर उपस्थित होते . सभेचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच अब्बू तडवी हे होते. उप सरपंच पदी शरद पांढरे यांची निवड झाल्याची घोषणा केली. उपसरपंचपदी शरद पांढरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे पॅनल प्रमुख माजी जि.प. कृषी सभापती प्रदीप लोढा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केले .कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला .

Exit mobile version