Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर पेठ येथे अवैध व्यावसायिकांचे गट एकमेकांना भिडले

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील बस स्थानक परिसरात अवैध व्यवसाय करणारे दोन गट एकमेकांना भिडल्याची घटना रात्री घडली असून त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका जुगार अड्ड्यावर उधारीची रक्कम मागितल्यावरून बसस्थानकाजवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास वाद झाले. त्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. थोड्याच वेळात दोन गटात दगडफेक सुरु झाली. याबाबत पंचायत समितीचे माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक किरण बर्गे हे आपल्या सहकार्‍यांसह घटना स्थळी पोहोचले. त्यांनी आवाहन करूनही जमाव ऐकत नसल्याने पोलिसांनी लाठीमार केला. यामुळे हा जमाव पांगला. मात्र यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्मित झाले होते.

या हाणामारीबाबत रात्री उशिरापर्यंत कोणाविरूद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version