Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे सीसीआयच्या कापूस खरेदीस प्रारंभ

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील तिरूपती जिनींगमध्ये आ. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सीसीआयच्या कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला.

पहूर येथे आज कापूस खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी कापसाला ५,८२५ रुपये भाव देऊन शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, माजी जि प.कृषी सभापती प्रदिप लोढा, माजी पं. स. सभापती बाबुराव घोंगडे, माजी जि. प.सदस्य राजधर पांढरे, जि.प.सदस्य अमित देशमुख ,सरपंचपती रामेश्‍वर पाटील, उपसरपंच शाम सावळे, आरोग्य दूत अरविंद देशमुख, ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, सुरेश बोरसे उपसभापती पंचायत समिती जामनेर,भास्कर पाटील, दौलत घोलप, किसान मोर्चाचे संतोष चिंचोले, राजमल भागवत, समाधान पाटील, बाजर समितीचे प्रसाद पाटील प्रशासक डि.व्ही.पाटील, प्रमोद पाटील तिरुपती जिनिंग प्रेसिंग चे संचालक ज्ञानेश्‍वर पाटील, किशोर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजधर पांढरे यांनी तर सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले.आभार भारत पाटील यांनी मानले.

याप्रसंगी आमदार महाजन म्हणाले की, शेतकर्‍याचा मकाचे उत्पन्न यावर्षी खूप चांगलं आलेल आहे मात्र बाहेर खाजगी व्यापारी मका खरेदीत त्यांना योग्य मोबदला देत नसल्याने शासनाने हमी भावाप्रमाणे मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केले मागील वर्षी सी. सी.आय.कापूस केंद्र सुरू झाले मात्र बर्‍याच वेळा बंद सुरू झाले असल्याने शेतकर्‍यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला मात्र यावर्षी सी .सी.आय. कापूस केंद्र सुरळीत सुरु ठेवण्यात यावे असेही आमदार गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले .

Exit mobile version