Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर कसबे हा भाजपचा किल्ला अबाधित; तीन दशकांपासून सत्ता कायम

पहूर, ता. जामनेर रवींद्र लाठे । गेल्या तब्बल ३० वर्षांपासून भाजपचा अंमल असणार्‍या पहूर कसबे ग्रामपंचायतीत भाजपने आता देखील विजय संपादन करून आपली सत्ता कायम राखली आहे.

जामनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या केंद्रबिंदू असलेल्या पहूर कसबे ग्रामपंचायतीवर भाजपा प्रणीत जय गोगडी – देवळी विकास पॅनलने १७ पैकी ९जागांवर विजय मिळवत गेल्या तीस वर्षांची सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले आहे . तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, व काँग्रेस महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलला सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे .

विशेष म्हणजे या निवडणुकीत पहूर कसबे गावाच्या इतिहासात ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच राजू रामदास जाधव आणि विक्रम पंडीत घोंगडे या दोन अपक्ष उमेदवारांना जनतेने विजयाचा कौल दिला आहे.
पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७जागांसाठी ५ अपक्षांसह ३९ उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले .

गेल्या तीस वर्षापासून पहूर कसबे ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित केले असून सत्ता कायम राखण्यात माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे यश आले आहे. यात भाजप प्रणीत जय गोगडी -देवळी विकास पॅललचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे आहेत.

वार्ड क्रमांक १ मध्ये तेजराज अरुण बावस्कर ,
शेरखा निजाम तडवी
वार्ड क्रमांक – ३ आशा शंकर जाधव
वार्ड क्रमांक – ४
योगेश विठ्ठल भडांगे,
वासुदेव पंडित घोंगडे ,
ज्योती सुभाष धनगर,
वार्ड क्रमांक ५
जिजाबाई पुंडलिक लहासे
वार्ड क्रमांक ६
सुनिता लक्ष्मण गोरे आणि अनिता शिवदास लहासे .
तसेच महाविकास आघाडी पुरस्कृत परीवर्तन पॅनलचे प्रभाग निहाय विजयी उमेदवार खालील प्रमाणे .
वार्ड क्रमांक – २
मनिषा युवराज चौधरी
प्रतिभा ईश्वर बनकर
वार्ड क्रमांक – ३
मिराबाई शिवाजी राऊत ,
विनोद रामदास थोरात ,
वार्ड क्रमांक -५
कल्पना दिनकर पवार
वार्ड क्रमांक-६
अशोक लक्ष्मण जाधव
तसेच वार्ड क्रमांक २ मधून अपक्ष उमेदवार राजू रामदास जाधव, व वार्ड क्रमांक ५ मधून अपक्ष उमेदवार विक्रम पंडित घोंगडे यांनीही विजय झाला आहे.

Exit mobile version