Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पदमश्री डॉ. शेखर बसू यांचं निधन

 

कोलकाता : वृत्तसंस्था । अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मक्षी डॉ. शेखर बसू यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाचं निदान झालं होतं. त्यांच्यावर कोलकातातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

काही दिवसांपूर्वीच डॉ. बसू यांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर त्यांना कोलकातातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच गुरूवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी त्यांचं निधन झालं. डॉ. शेखर बसू यांना कोरोनाबरोबरच किडणीचाही त्रास होता.

अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राहिलेल्या डॉ. बसू यांना २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. डॉ. बसू हे मॅकेनिकल इंजिनिअर होते. देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. डॉ. शेखर बसू यांनी अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी अत्यंत कठीण असणारी अणुभट्टी देखील तयार केली होती.

Exit mobile version