Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात माजी आ. स्व. ओंकार वाघ यांची जयंती साजरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | खान्देशचा ढाण्या वाघ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले पाचोरा तालुक्याचे सहकार, आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी माजी आमदार स्व. आप्पासाहेब ओंकार वाघ यांची आज ९० वी जयंती साजरी करण्यात आली.

स्व. आप्पांच्या शक्तीस्थळाला माजी आमदार दिलीप वाघ, पी.टी.सी. चेअरमन नानासो संजय वाघ, कृ.उ.बा. माजी सभापती दगाजी वाघ पुष्पार्पण व अभिवादन केले. सहकार आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी कै. ओंकार (अप्पा) वाघ समाजकारण, सहकार, शिक्षण केंद्रबिंदू मानून पाचोरा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू केले. मतदारसंघात विविध प्रकल्प आणून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेकविध आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. खलील देशमुख व विनायक जकातदार यांनी स्व.आप्पासाहेबाच्या आठवणीना उजाळा दिला.

यावेळी मधुकर ओंकार वाघ,पी. टी. सी. चे व्हा. चेअरमन विलास जोशी, खलील देशमुख, पं. स. गटनेते ललित वाघ, नगरसेवक भुषण वाघ, वासुदेव महाजन, अशोक मोरे, आकाश वाघ, विजय पाटील, सरपंच बुऱ्हान तडवी, उपसरपंच शशिकांत वाघ, अजय अहिरे, प्रदीप वाघ, पितांबर कोतवाल, प्रेमराज शेवगे, सुभाष शिंदे, अली पेंटर, गुलाब तडवी, अली मेवाती, जगदीश वाघ, पिंटू दारकोंडे, भाऊसाहेब पाटील, सदाशिव नरवाडे, नामदेव पाटील, सुभाष शिंदे, सुभाष शिर्के, राजेंद्र सोनार, रवींद्र पाटील, राजु गावंडे, गोदाराम बडगुजर, भगवान डांबरे, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य वासुदेव वले, व्ही. एन. गायकवाड, मुख्याध्यापक सुधीर पाटील, प्राचार्य डी. व्ही. पाटील, पर्यवेक्षक जी. एन. पाटील तसेच पाचोरा तालुका सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सरपंच, उपसरपंच सदस्य, सोसायटी सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले.

Exit mobile version