Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विदर्भ तायक्वांदो युथ फायटर्स आयोजित अमरावती येथे झालेल्या युथ फायटर्स पहिली विदर्भ तायक्वांदो स्पर्धेत पाचोरा तालुका तायक्वांदो असोसिएशन व गणराज स्पोर्ट्स अकॅडमी पाचोऱ्याच्या खेळाडूंनी चार रौप्य व तीन कांस्य पदक पटकावून स्पर्धेत यश मिळवले.

ही स्पर्धा दि. २९ ते दि. ३० जून दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कोल्हापूर, अमरावती, जालना, पुणे, नाशिक, अहमदनगर येथील सुमारे ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात पाचोरा येथील १० विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांनी विजय मिळवला.

यात प्रामुख्याने रोप्य पदक विजेते खेळाडू – नियती गंभीर, ऋतिका खरे, जयदीप परदेशी, साहिल बागुल, कास्य पदक विजेते खेळाडू प्रवीण खरे, ललित महाजन, जीवनी बागुल यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत यश संपादन केले. या खेळाडूंना पाचोरा येथील प्रशिक्षक सुनिल मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेते खेळाडूंचे रमेश मोर यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version