पाचोरा येथे उद्यापासून कैला माता महोत्सव 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्री कैला माता मंदिर संस्थान, भडगाव रोड येथे सालाबादप्रमाणे श्री. महिषासुर मर्दिनी सप्तमी – अष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवसीय श्री. कैला माता महोत्सवात दिनांक ८ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत श्री कैला माता करोलीवाली देवी च्या भक्तिमय गीतांचे जागरण तर दि. ९ मे २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २:३० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री कैला माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद घ्यावा. असे आवाहन श्री. कैला माता मंदिर संस्थानचे अध्यक्ष जगदीशशेठ माथुरवैश्य, तसेच कार्यवाह पुरुषोत्तम भाईसाहेब अग्रवाल, डॉ. अनुप अग्रवाल व उत्सव समितीने केलेले आहे.

Protected Content