Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे नवीन कापूस खरेदीस सुरुवात

 

 

पाचोरा, प्रतिनिधी | येथील श्री गजानन जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी, गिरड रोड, पाचोरा च्या आवारात नवीन कापूस खरेदीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज सकाळी ११ वाजता करण्यात आला.

उद्घाटनाच्या दिवशीच कापसाला ७ हजार १०१ रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी झाली. येथील नगर परिषदेच्या माजी नगरसेविका लता राजाराम सोनार यांच्या शुभहस्ते काटा पूजन व बाजार समितीचे संचालक संजय सिसोदिया यांच्या हस्ते कापूस पूजन करून नवीन हंगामाच्या कापसाची खरेदी करण्यात आली. याप्रसंगी शेख यासीन बागवान, राजाराम सोनार, श्री गजानन जिनिंग संचालक प्रमोद सोनार, डॉ. दिनेश सोनार उपस्थित होते. महाराष्ट्रात कापसाला ६ हजार रुपयांचा शासकीय हमीभाव देण्यात आला असून त्यापेक्षा जास्तीचा म्हणजे ७ हजार १०१ रुपये प्रतिक्विंटल भाव आजपासूनच खुल्या बाजारात देण्यात आला. पाचोरा येथील श्रीगजानन जिनिंग मध्ये हमी भावापेक्षा जास्त रकमेने व रोखीने कापूस खरेदी सुरू करण्यात आल्याने पाचोरा – भडगाव परिसरात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्री. गजानन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी मध्ये सिल्लोड येथील यासीन बागवान तसेच संजय सिसोदिया, डी. एन. पटेल, रोहित अग्रवाल यांच्या संयुक्त फर्म तर्फे कापसाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याला सर्वश्री नारायण पटेल, रमेश पटेल, अमीन बागवान, राहुल तायल, किरण जैन, गोपीचंद पाटील, शरीफ बागवान, योगेश राजपूत, जुबेर पठाण, ईमरान शहा , गफ्फार देशमुख, इलियास बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. शुभमुहूर्तावर कापूस विक्रीसाठी आलेले कापूस विक्रेते शेतकरी राउफखा अय्युबखा, गोविंदा चौधरी, सुरेश चव्हाण यांचा श्री.गजानन जिनिंग तर्फे शाल, टोपी, रुमाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मानकी चे सरपंच संजय पाटील, राहुल पाटील, अंतुरली येथील भैय्या पाटील, संजय दीक्षित, दिपक पाटील व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुंदन गायकवाड, संजय खेडकर, काशिनाथ पाटील, संजय कुमार, अमोल राजपूत, अनिकेत मिस्त्री, भूषण वाडेकर, सचिन तेली आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version