Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे गुरुपौर्णिमानिमित्ताने विविध कार्यक्रम

pachora 1

पाचोरा प्रतिनिधी । येथील चर्मकार उठाव संघातर्फे आज गुरुपौर्णिमानिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी चर्मकार उठाव संघाचे विभागीय उपाध्यक्ष राजू सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर युवक जिल्हाध्यक्ष गंगाराम तेली यांनी मनोगत व्यक्त करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. ह.भ.प. बापु महाराज यांनी शंखनाद करून महाआरतीस सुरवात केली. तसेच प्रमुख मान्यवर शिवसेनेचे जितु जैन, भाजपचे विरेंद्र चौधरी, आदर्श पत्रकार गणेश शिंदे, तालुकाध्यक्ष नितीन तायडे, जिल्हासंघटक संदीप गाडेकर, देवराम अहिरे, विसावे आप्पा यांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी नाना मोरे, दिलीप अहिरे, संपक वानखेडे, भिकन वाघ, गोपाल मोरे, बबलू लिंगाईत, मनोज निकम, मधुकर मोची, आकाश मोची, संदीप सावकारे, रमेश सावंत, अनिल अहिरे(शेट्टी), रमेश पवार, संत रविदास नगरचे शाखा अध्यक्ष राहुल सकतीकर उपस्थीत होते. समाज बांधवांना फळवाटप करुन सर्व समाज बांधवाचे आभार तालुकाध्यक्ष नितीन तायडे यांनी मानले आहे.

Exit mobile version