Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्मल फाऊंडेशनतर्फे पत्रकारिता कार्यशाळा उत्साहात

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा निर्मल सिड्सच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी यांनी पत्रकार दिनानिमित्त आज पाचोरा व भडगाव तालुक्यातील पत्रकारांसाठी निर्मल इंटरनॅशनल स्कुलमधे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तर प्रमुख पाहुणे म्हणून देशदुतचे संपादक हेमंत आलोने, दैनिक पुण्यनगरीचे संपादक विकास भदाने, दैनिक सकाळचे ब्युरो चीफ सचिन जोशी, दैनिक देशोन्नतीचे संपादक मनोज बारी, निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या अध्यक्षा वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसीह सुर्यवंशी, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपक राजपूत, उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उत्तम कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपले विचार मांडले यात भांडवलशाही व सत्ताधार्‍यांचा पत्रकारीतेवर दबाव असून मनमोकळेपणाने काम करण्यास मर्यादा येत आहेत यामुळे सद्य स्थितीत कॉर्पोरेटिव्ह पत्रकारीता सुरू आहे,पत्रकारांनी नेहमी पत्रकारीता करतांना डायरी सोबत ठेवावी कारण डायरी ही त्याचा आत्मा व स्वास आहे. पत्रकाराला समाजातील विविध घटकांकडून शब्द वाढविता येतात कारण याच शब्दाचे सामर्थ्य बातमिला बलवान करते यामुळे समाजाकडून पत्रकारांकडून निःपक्षपाती पत्रकारीता होण्याच्या अपेक्षा असतात असे सांगितले.

वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात पत्रकार हा निःपक्षपाती, निर्भिड व लढवय्या असावा, कारण पत्रकारांच्या लेखनिमूळे सामाजिक क्रांती घडू शकते पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा धारदार व बंदुकीच्या गोळीपेक्षा वेगवान असली पाहिजे. उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल यांनी पत्रकार राजकारणाला दिशा देण्याचे काम करतात पत्रकारांनी व्यवस्थीत लिखाण केल्यास लोकशाही मजबूत होईल असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैष्णवी पाटील यांनी केले. यावेळी रवि चौरपगार, निर्मल इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गणेश पाटील, उपप्राचार्य प्रा. प्रदिप सोनवणे, गणेश पाटील, संतोष पाटील यांचेसह पाचोरा, भडगाव, तालुक्यातील सोशल मिडिया, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया चे पत्रकार बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version