Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा : भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा येथे महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हितार्थ भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे महाएल्गार आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मुख्यमंत्री यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या आंदोलन कर्त्यांवर शिवसेने जोरदार प्रतिहल्ला करत त्यांचा जाहिर निषेध केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या प्रतिहल्ला आंदोलनात मुकुंद बिल्दीकर, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, संजय पाटील (भुरा आप्पा), उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, युवानेते सुमित किशोर पाटील, रमेश बाफना, मा. उपनगराध्यक्ष शरद पाटे, मा. नगरसेवक डॉ. भरत पाटील, बापु हटकर, दादाभाऊ चौधरी, प्रविण ब्राम्हणे, रमेश (तात्या) पाटील, डॉ. शेखर पाटील, जितेंद्र पेंढारकर, सुधीर पाटील, संदिपराजे पाटील, सागर पाटील, वैभव राजपुत, भुषण पेंढारकर, सोनु परदेशी, राजेंद्र पाटील (तारखेडा), शिवाजी ठाकुर (दिघी), भागवत कोष्टी, गोरख महाजन (नगरदेवळा), सागर पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दि. १५ मार्च रोजी महावितरण कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हितार्थ पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार व झोपेचे सोंग घेतलेल्या आमदारांना जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचा एकेरी भाषेत उल्लेख व स्थानिक आमदार किशोर पाटील यांचेबद्दल केलेल्या अप शब्दाच्या निषेधार्थ तसेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ घेतलेल्या विज तोडणी थांबविलेल्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुकुंद बिल्दीकर, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, युवानेते सुमित किशोर पाटील, अॅड. अभय पाटील यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टिकास्त्र सोडले.

 

 

Exit mobile version