Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा प्रांताधिकार्‍यांची अवैध वाळू वाहतुकीविरूध्द धडक कारवाई

पाचोरा प्रतिनिधी । येथील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी गिरणा खोर्‍यातून अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांच्या विरूध्द धडक कारवाई केल्याने वाळू तस्कर धास्तावले आहेत.

गिरड परिसरातून वाळू वाहतूक करणार्‍या पाच ते सात डंपरवर कारवाई करण्यात आली ही कारवाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्यासोबत भडगाव तहसीलदार गणेश मरकड, पाचोरा निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे, भडगाव निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, मंडळ अधिकारी हेमंत पाटील गणेश हटकर, एस. एस. पाटील. आर डी आप्पा, आर. डी. पाटील, तलाठी लक्ष्मण आगलावे, कैलास बहिर, तलाठी शिरसाट, तलाठी अविनाश लांडे, गिरड तलाठी प्रकाश पाटील, मयूर आगरकर व इतर तलाठी मंडळ कर्मचारी तसेच पाचोरा भडगाव पोलीस पथकासह ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत गोपनीय माहितीनुसार गिरड भागातील काही वाळू माफियांनी वाळू साठा वीट भट्टी जवळ लपवून त्यावरती माती पसरवली असल्याचे माहिती मिळाली असून याची देखील शोध होणार आहे. या कारवाईत औरंगाबाद जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाचा तालुका अध्यक्ष यांच्यावर मोठी कारवाई होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काही डंपर पाचोरा व भडगाव भागातील वाळू माफियाचे देखील असल्याचे बोलले जात आहे. कारवाईमुळे प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांचे कौतुक केले जात आहे. मात्र यामुळे वाळू तस्कर धास्तावले आहेत.

Exit mobile version