Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉलमार्किंग व एचयुआयडी विरोधात पाचोरा सराफांचा एक दिवसीय लाक्षणिक संप (व्हिडीओ)

पाचोरा नंदू शेलकर । केंद्र सरकारने व राज्य सरकारने अव्यवहारीक पद्धतीने लागु केलेल्या हॉलमार्किंग व एचयुआयडी विरोधात पाचोरा शहर सराफ असोसिएशनतर्फे एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आला आहे. शहर सराफ असोसिएशनतर्फे सराफ बाजारापासुन ते उपविभागीय अधिकारी कार्यालयाला पर्यंत विरोध दर्शक बॅनर व हाताला काळ्या फिती बांधून सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने सराफ बांधव उपस्थित होते.

सोन्यावर हॉलमार्किंग प्रक्रियेच्या विरोधात आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारुन दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. हॉलमार्कचे आम्ही स्वागत करतो, परंतु अव्यवहारीक पद्धतीने लागु केलेल्या हॉलमार्किंग पद्धतीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र भर ज्वेलर्स, सराफ व सुवर्णकार ब्युरो ऑफ इन्वेस्ट इन स्टॅंडर्ड – १ नुसार त्रासदायक जाचक प्रक्रिया, ज्वेलर्सचे कोणतेही ओळख चिन्ह नाही, तसेच दागिन्यांची सुरक्षितता नाही, सोन्यावर हॉलमार्किंग केल्यानंतर दागिन्यांमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. अशा जाचक अटींमुळे व तो मान्य नसल्यामुळे पाचोरा शहर सराफ असोसिएशनतर्फे एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. तसेच सराफ असोसिएशनतर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना जाचक अटीं विषयीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश (नाना) देवरे, सेक्रेटरी कमलाकर जडे, खजिनदार प्रकाशशेठ जैन, सदस्य राजेश संघवी, किशोर सराफ, लक्ष्मणराव घाडगे, कांतीलाल जैन, निखिल सराफ, अनिल सराफ, राजेंद्र बाविस्कर, कांतीलाल बनोटीवाला सह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version