Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवारांच्या दौऱ्यात चोरट्यांची चांदी, अनेकांचे खिसे कापले

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आयोजित सभेत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एकुण ५९ हजार रूपयांची रोकड आणि दोन मोबाईल लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरातील महाविद्यालयात गुरूवारी सकाळी ११ वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आयोजित सभेपुर्वी चाळीसगाव येथुन येत असतांना स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या निर्मल सिडस येथे जावुन सदिच्छा भेट दिली असता यावेळी वैशाली सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत सह शिवसैनिकांनी अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक धर्मेद्र उत्तम चौधरी यांचेसह दादु काळु गौंड, रविंद्र पंडित चौधरी हे ही सोबत गेले असतांना धर्मेंद्र उर्फ दादाभाऊ चौधरी यांच्या पॅंडच्या खिशातून ३१ हजार रूपये लांबवले. यानंतर अजित पवार यांचा ताफा पाचोरा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यावर मोंढाळे येथील देवराम महादु पाटील यांचे खिशातुन १ हजार ९०० रुपये, गाडगेनगर येथील वैभव शिवाजी पाटील यांचे खिशातील २ हजार २०० रुपये व जिजामाता कॉलनीतील रहिवाशी अॅड. दिपक विठ्ठल पाटील यांच्या खिशातुन ४ हजार ६०० रूपये, पुनगाव येथील सागर सुरेश पाटील यांच्या खिशातील १० हजार रूपयांचा ओपो कंपनीचा मोबाईल व एक अज्ञात व्यक्तीचा ३ हजार रूपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरण्यात चोरटे यशस्वी झाले. घटनेप्रकरणी अज्ञात चोरट्या विरूध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची फिर्याद दादाभाऊ चौधरी यांनी दिली असुन घटनेचा तपास पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो. ना. नरेंद्र नरवाडे हे करित आहेत.

Exit mobile version