Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नगरदेवळ्यात न्युमोकॉकल लसीकरणास प्रारंभ

पाचोरा प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात न्युमोकॉकल लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे.

नगरदेवळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. १२ पासुन न्यूमोनिया (पी. व्ही. सी.) लसीकरणास सुरवात करण्यात आली. यावेळी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील उपस्थित होते. लहान मुलांचे शरीर हे कमजोर असते, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत नसते. त्यामुळे कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी ते बाळ सक्षम नसते. म्हणून त्यांना अधिक आजार होण्याचा धोका असतो. छोटेसे इन्फेक्शन सुद्धा गंभीर आजाराचे रूप घेऊ शकते. म्हणूनच लहान बाळाला जीवपेक्षा जास्त जपतात.

लहान मुलांमध्ये सर्वाधिक आढळणार्‍या आजारांपैकी एक आजार म्हणजे न्युमोनिया हा आहे. न्यूमोनिया आजारावर वेळीच उपचार न घेतल्याने तो जीवघेणा सुद्धा ठरू शकतो म्हणून योग्य वेळी योग्य उपचार घेणे आवश्यक असते. दिड महिन्यापासून ते एकवर्षापर्यंत च्या बालकांना न्यूमोनिया लस देण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी विरेंद्र पाटील, डॉ. सुवर्णा सदानशिव, एल. एच. व्ही. आशा दराडे, फार्मसिस्ट मनोज येवले, आरोग्य कर्मचारी, परिचारिका आरोग्य सेवक उपस्थित होते.

Exit mobile version