Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विविध मुद्यांवरून गाजली पाचोरा येथील आमसभा

पाचोरा प्रतिनिधी । येथील पंचायत समितीत आयोजित करण्यात आलेली आमसभा अनेक विषयांवरून गाजली. यात विविध खात्यांना कामाबाबत उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती

आजची आमसभा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रारंभी शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या नंतर सरस्वती मातेचे पूजन करण्यात आली. या सभेत खासदार ए.टी.नाना पाटील, पंचायत समिती सभापती बन्सीलाल पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आदी उपस्थित नव्हते. तर या आमसभेला पंचायत समिती उपसभापती अनिता पवार, नगराध्यक्ष संजय गोहिल, तहसीलदार बीए कापसे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, सार्वजनिक बांधकाम अभियंता डी. एम. पाटील. जि. प. सदस्य पदमसिग पाटील, दिपकसिंग राजपूत, रावसाहेब पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटील नगरसेवक सतीश चढे, मुकूंद बिल्दीकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, अरुण पाटील, शरद पाटील, एस. एल. पाटील, शाखा अभियंता डी व्ही परमे, माजी सभापती अनिल पाटील, साहेबराव पाटील, आर डी डेपले, विस्तार अधिकारी समाधान पाटील, रामू पाटील यांच्या तलाठी ग्रामसेवक मुख्यध्यपक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अधिकार्‍यांबाबत रोष

या आमसभेत विविध सरकारी अधिकार्‍यांबाबत रोष व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नगरदेवळा भारत दूरसंचार निगम सामाजिक वनीकरण तहसील कार्यालय नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी यांना निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पाचोरा तालुका कृषी अधिकारी व जलसंधारण प्रशिक्षण, लघु पाटबंधारे विभाग, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विकास प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभाग पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, वनपरिक्षेत्र वनपाल अधिकारी आदी विविध खात्यांशी संबंधीत विषयांवर चर्चा करण्यात आली. यात उपस्थितांनी अधिकार्‍यांना धारेवर धरून आठ दिवसांच्या आत समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली. तालुक्यातील पाटबंधारे विभागात सुमारे २२ ते २४ कर्मचारी नाहीत. यामुळे कर्मचार्‍यांना तातडीने भरती करायच्या संदर्भातला प्रस्ताव रिक्त जागांचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.

या आमसभेत वाळू चोरीचा मुद्दादेखील गाजला. वाळू चोरी मुळे अनेक ठिकाणी सामाजिक शांतता धोक्यात असल्याचे सांगण्यात आले. तर ग्रामपंचायतीनिहाय लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळत नसल्याबाबतही चर्चा करण्यात आली.

Exit mobile version