Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निष्ठेची शपथ घेत उध्दव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक मैदानात ! ( व्हिडीओ )

पाचोरा, प्रतिनिधी | मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी आज महादेव मंदिरात निष्ठेची शपथ घेऊन पक्षासोबत राहण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला.

पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यमान तीनही जिल्हा परिषद सदस्य, माजी दोन्ही सदस्यासह जुन्या पदाधिकार्‍यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आज दि. २५ जुन रोजी दुपारी घोषणा बाजी करत आंदोलन केले. यात ही सर्व चाल भाजपाची असल्याने हा सर्व खेळ सुरू झाला असून भविष्यातील अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहिल असे अनेकांनी मत व्यक्त केले.

दरम्यान, याप्रसंगी, पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी परत यावे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंगार आहे, बाकी सब भंगार है, उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आदित्य साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. आमदार किशोर पाटील हे लवकरच परत तेथील आणि स्व. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या मुळ शिवसेतेतच राहतील अशी खात्री व्यक्त करण्यात आली.

पाचोरा तालुक्यात पाच पैकी तीन जिल्हा परिषद सदस्य असून यात नगरदेवळा बाळद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गटातील जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, बांबरुड – कुरंगी गटाचे सदस्य पदमसिंग पाटील, लोहारा- कुर्‍हाड गटाचे सदस्य दिपकसिंग राजपूत, पिंपळगाव – शिंदाड गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, बांबरुड – कुरंगी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य राजेंद्र साळुंखे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख रमेश बाफना, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, माजी शहरप्रमुख भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, प्रविण पाटील, प्रविण मोरे, अजय पाटील, आनंदा माळी,अरुण तांबे, शिवाजी परदेशी, बंडू मोरे, विनोद गवळी, संतोष कुमावत, देवा सोनार, सुभाष पाटील, खंडू कुमावत, स्वप्नील देवरे, पप्पू जाधव,शंकर मारवाडी अस अनेक गावांतील विभाग प्रमुख,शाखा प्रमुख सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

महादेव मंदिरात घेतली एकनिष्ठेची शपथ

ऍड. अभय पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, उद्धव मराठे, पदमसिंग पाटील, अरुण पाटील, रमेश बाफना यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आम्ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असून त्यांचे विचारात घडलेलो आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख असून त्यांचेशी कधीही गद्दारी करणार नाही. त्यांचेवर कितीही संकटे आली तरी आम्ही त्यांचे पाठीराखे ठामपणे उभे राहून शिवसेना पक्षाला बळ देवू अशी शपथ घेऊन किशोर आप्पा तुम्ही परत या असे आवाहन आमदार किशोर पाटील यांना केले.

खालील व्हिडीओत पहा शिवसैनिकांनी घेतलेली एकनिष्ठेची शपथ !

Exit mobile version