Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. किशोरआप्पांचा डबलबार ! कजगाव व शिंदाडच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने शिंदाड व कजगाव या दोन गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने व पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने शिंदाड व कजगाव या दोन गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यतर्फे आज प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्ह्यातील २६ गावांमधील पाणी पुरवठा योजनांसाठी ५२८ कोटी ५४ लाख रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील १६ गावांच्या ३४८ कोटी ६२ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशाकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील २८७ कोटी ६७ लाख रुपयांच्या १२ योजनांची कार्यादेश देण्यात आलेले आहेत. आमदार किशोर पाटील यांच्या मागणीनुसार शिंदाड व कजगावला पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाल्याने तेथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीचा धडाका ना. गुलाबराव पाटील यांनी सुरू केला आहे. आमदार किशोर पाटील यांच्या मागणीनुसार मंत्रालयात ना.गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक आयोजित केली होती. त्यात जिल्ह्यातील २ मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्याचे निर्देशही दिले होते. जिल्ह्यातील लहान मोठ्या गावांचे जास्तीत जास्त प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत. दरम्यान या पाणी पुरवठा कामांच्या अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, पाईपलाइन, पाण्याची टाकी आदी कामे केली जाणार आहेत.

या संदर्भात बोलतांना आ. किशोर पाटील म्हणाले की, एकीकडे लहान आणि मध्यम लोकसंख्येच्या गावांच्या योजनांसाठीचा जिल्ह्यातील कृती आराखड्यानुसार योजनांनाची कामे सुरू झाली आहेत. तर सोबतच मतदार संघातील तुलनेने मोठ्या असणार्‍या गावांना पाणी पुरवठा योजनांना सुध्दा आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.तसेच, मतदारसंघातील ज्या गावांना पाणीपुरवठ्याच्या योजना नाहीत अशा सर्व गावांना पाणी पुरवठा योजना मंजुरी साठी आपण पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्फत प्रयत्न केले असून काही गावांची निविदा प्रक्रिया झाली असून काही कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती देखील आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version