Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिग्मी एजंटांना शासकीय मदत देण्याची मागणी

पाचोरा, प्रतिनिधी । कोरोनामुळे सर्व व्यवसायांना फटका बसला असून यामुळे पिग्म एजंटांवर सुध्दा उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे या एजंटांना शासनाने मदत करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

शासनाने पिग्मी एजंटाना मदतीचा हात द्यावा अशी मागणी रविशंकर पांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यात म्हटले आहे की, संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे निर्बंध कायम आहेत. देशातील व राज्यातील जनतेच्या हितासाठी शासनाने घेतलेला निर्णय चांगला असला तरी लहान सहान व्यावसायिकांना बचतीचे धडे देणार्‍या विविध सहकारी बँक व पतसंस्था मध्ये दैनिक ठेव जमा करणार्‍या पिग्मी एजंटावर मात्र या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. दैनिक ठेवी बंद झाल्याने केवळ यावर अवलंबून असलेल्या पाचोरा तालुक्यातील पिग्मी एजंटावरती उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येत आहे.

पाचोरा शहरी व ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या व्यवसायकांसाठी बँका सह पतसंस्था बचती साठी मोलाचे ठरले आहे. या संस्था मधून घेतलेल्या कर्जातून अनेकांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अशा संस्थांमध्ये दैनिक ठेव च्या स्वरुपात पैसे ठेवणार्‍यांची संख्या मोठी आहे. काही सहकारी बँकांसह पतसंस्थां मध्ये अशा व्यवसायीकां कडून बचत ठेव जमा करण्याचे काम पिग्मी एजंट करतात. अशा पिग्मी एजंटाची पाचोरा तालुक्यात संख्या बरीच आहे. सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने या पिग्मी एजंटा कडून रोज केले जाणारे कलेक्शनच बंद झाले. त्याचा फटका व्यवसायीकां प्रमाणे त्यांच्या कडून दररोज पैसे जमा करणार्‍या पिग्मी एजंटानाही बसला आहे.

सध्या कलेक्शनच होत नसल्याने रोजच्या उदरनिर्वाहच्या दृष्टीने शासनाने इतर व्यवसायीकांना व मजूरांना शासना कडून मदतीचा हात दिला आहे. त्याच प्रमाणे असंघटित कामगार व इतर मजुरां प्रमाणे पिग्मी एजंटाचा त्या योजेनेत समवेश करून शासना कडून मदत मिळावी अशा आषयाची मागणी पिग्मी एजंट रविशंकर पांडे यांनी केली असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

तसेच आमदार किशोर पाटील, पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पाचोरा यांना ही निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर रविशंकर पांडे, विलास भागवत पाटील, श्रीकृष्ण दलाल, घनश्याम दायमा, रविंद्र वाणी यांच्या सह्या आहेत.

Exit mobile version