Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : सहा वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “पाचोरा शहरातील एका भागात सहा वर्षीय चिमुकली आपल्या परिवारासह राहते. त्याच परिसरात राहणारा ३० वर्षीय तरूण देखील राहतो. सहा वर्षाची चिमुकली ही तरूणाच्या घरी खेळण्यासाठी गेली असता तिला लज्जा उत्पन्न हाईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. आपल्या सोबत घडलेला प्रकार पिडीत मुलीने घरच्यांना सांगितला. तातडीते पिडीत मुलीसह कुटुंबियांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पाचोरा पोलीसांनी अटक केली आहे. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादवरून पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ उडाला होता. दरम्यान पोलीसांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version