Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. किशोर पाटलांची कोरोनावर मात; पुन्हा सक्रीय कामकाजास प्रारंभ

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून ते पुन्हा दैनंदिन कामकाजात व्यस्त झाले आहेत.

पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. आता त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून ते दैनंदिन कामकाजात पुन्हा व्यस्त झाले आहेत. उपचारानंतर क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण करून आणि सर्व शासकीय नियमांचे पालन करून ते पुन्हा जनसेवेत रूजू झाले आहेत.

या अनुषंगाने त्यांनी नुकतीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात त्यांचा कोरोना मुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. तर याप्रसंगी व्यक्त केलेल्या मनोगतातून त्यांनी मतारसंघात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेला यशस्वीपणे राबविण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.

या वेळी उप जिल्हा प्रमुख गणेश परदेशी, अभय पाटील, मनोहर चौधरी, जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, पद्मसिंह पाटील, दीपकसिंग राजपूत, अरुण पाटील, उद्धव मराठे, शरद पाटील, किशोर बारावकर, गणेश पाटील यांच्यासह मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version