Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना योध्दा डॉक्टरची दुचाकी चोरट्यांनी केली लंपास

पाचोरा, प्रतिनिधी । कोरोनाच्या संसर्ग काळात कार्यरत असणार्‍या डॉक्टरची दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शहरातील कृष्णापुरी भागातील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. राहुल प्रभाकर झेरवाल यांची बजाज कंपनीची दुचाकी (पल्सर) एम. एच. १९ – सी. सी. ७३४९ हॉस्पिटल समोरुन चोरून नेल्याची घटना घडली. हॉस्पिटल च्या या रस्त्याने रात्री पोलीस गाडी ये-जा करत असते. तसेच अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणार्‍या वाहनांची रहदारी देखील पहाटे पासून सुरू असते. पण तरीही भर रस्त्यावरून दुचाकी चोरणारे चोरटे नेमके कोण ? यासंबंधी पाचोरा पो. स्टे. शोध घेत आहे. तसेच सर्व नागरिकांना आवाहन आहे की, आपली दुचाकी, साखळी किंवा इतर अत्यावत वस्तूंनी काळजीत ठेवावीत. कारण संचार बंदी असल्याने रात्रीची रहदारी अल्प असल्याचा चोरटे फायदा घेतात असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version